Personality Development Workshop for University Representative:-


१. आत्मनिर्भर युवती अभियान

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना अभ्यासेत्तर इतर उपक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करुन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व विविध अंगाने आत्मनिर्भरता निर्माण होण्याकरीता जस की सायबर क्राईम जनजागृती, बँक व्यवहार जागृती, कृषी विषयक जागृती, स्व आरोग्य, स्वयंरोजगारच्या विविध योजना तसेच पर्यावरण जागृती, सॉफ्ट स्किल, योगा व विविध कला गुण विकसित करणे या भूमिकेतून विद्यापीठाने आत्मनिर्भर युवती अभियान ही योजना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत सुरु करण्यात येत आहे.
विद्यार्थीनी विविध सामाजिक, आर्थिक, कायदेविषयक, आरोग्यात्मक, पर्यावरणात्मक, डिजिटल क्रांती व त्यातून निर्माण होणारे सायबर क्राईम्स, सोशल मिडीया जनजागृती या सर्वांगाने आत्मनिर्भर व्हाव्यात या दृष्टीकोनातून आत्मनिर्भर होण्यासाठी सदरची योजना हाती घेण्यात आलेली आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थीनींचा आत्मविश्वास वृध्दिगत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

योजनेची पात्रता :- ही योजना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय व मान्यताप्राप्त संस्था व विद्यापीठ शैक्षणिक प्रशाळा विभाग यामध्ये पदविका, पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणा-या नियमित विद्यार्थीनींकरीता राबविण्यात येते.

योजनेसाठीचे अनुदान :- या योजनेसाठी विद्यापीठाकडून १५ हजार रुपये अनुदान देण्यात येते.


२. अग्निवीर सैन्य दल भरती पूर्व प्रशिक्षण अभियान

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेणा-या विद्याथ्यांना अभ्यासेत्तर इतर उपक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करुन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व विविध अंगाने आत्मनिर्भर व सशक्त भारताचे रवा पूर्ण करण्याकरीता युवकांची एक महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. या उद्देशाने युवकांमध्ये राष्ट्राभिमान, राष्ट्रसेवा व शिस्त हे मुल्य रुजविण्यासाठी व त्यांना या दृष्टीकोनातून कौशल्य युक्त बनविण्यासाठी ही योजना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून विद्यापीठ क्षेत्रातील संलग्नित महाविद्यालय व विद्यापीठ प्रशाळा-विभाग मधील पदविका, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरीता लागू करण्यात येत आहे.

अभियानाचे स्वरुप :- या उपक्रमामध्ये त्याच महाविद्यालयातील ४० विद्याथ्यांना त्यामध्ये मुलं व मुली मिळून अग्निवीर पूर्व प्रशिक्षण, सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण दिले जाईल. या उपक्रमाचा कालावधी एकूण सहा दिवसांचा असेल. एनसीसी चे १८ बटालियनचे अधिकारी किंवा कमांडर पाच दिवस सदर महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांना किमान दोन तास On Ground व थेअरी प्रशिक्षण देतील. सहाव्या दिवशी पाच दिवस घेतलेल्या प्रशिक्षणाची रंगीत तालीम व डेमो समारोप समारंभाच्या दिवशी प्रमुख पाहुण्यांसमोर सादर करण्यात यावा. यासंदर्भात संबंधित महाविद्यालयाने सुध्दा उपक्रम घेण्या अगोदर महाराष्ट्र १८ बटालियन त्यांच्याशी एम ओ यु करार करुन किंवा त्यांच्याशी चर्चा करून सदर उपक्रमात त्यांच्याकडून प्रशिक्षण सेवा मिळवावी. विद्यार्थी विकास विभागाने ठरवून दिलेल्या प्रमाणे मानधन देण्यात यावे.
सदर उपक्रम विभाग वार तीन महाविद्यालयांना (बारा महाविद्यालयांमागे तीन महाविद्यालयांना १२: ०३) एका शैक्षणिक वर्षाला दिला जाईल तसेच दुस-या वर्षी मागील वर्षी दिलेल्या महाविद्यालयांना हा उपक्रम मिळणार नाही. दुस-या वर्षी नविन महाविद्यालयांना हा उपक्रम मिळू शकेल. त्यासाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक असेल.

अभियानाची पात्रता :- ही योजना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय व मान्यताप्राप्त संस्था व विद्यापीठ शैक्षणिक प्रशाळा विभाग यामध्ये पदविका, पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणा-या नियमित विद्यार्थीनींकरीता राबविण्यात येते.

अभियानासाठीचे अनुदान:- या योजनेसाठी विद्यापीठाकडून १५ हजार रुपये अनुदान देण्यात येते


३. मिशन साहसी अभियान

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेणा या विद्यार्थिनींना अभ्यासेत्तर इतर उपक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करुन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व विविध अंगाने आत्मनिर्भर व सशक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्याकरीता महिलांची एक महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. या उद्देशाने युवतींमध्ये राष्ट्राभिमान, राष्ट्रसेवा व शिस्त हे मूल्य रुजविण्यासाठी व त्यांना या दृष्टीकोनातून कोशल्य युक्त बनविण्यासाठी ही योजना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून विद्यापीठ क्षेत्रातील संलग्नित महाविद्यालय व विद्यापीठ प्रशाळा- विभाग मधील पदविका, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरीता लागू करण्यात येत आहे.

अभियानाचे स्वरुप :- या मिशन साहसी अभियान हा उपक्रम युवती सभा अंतर्गत घेण्यात यावा. पाच दिवस रोज दोन तास, त्याच महाविद्यालयातील ४० विद्यार्थीनी करता, स्वरक्षणार्थ कराटे किंवा योगा शिक्षण, स्त्री आरोग्य विषयक जागृती समस्या संदर्भात उपाययोजना, स्त्री स्वयंरोजगार विषयक माहिती देणे, या कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना आमंत्रित करावे., व्याख्यान न ठेवता खुले चर्चा सत्र तसेच गट चर्चा ठेवावी., विद्याथीनींना त्यांचे अनुभव शेअर करण्याकरीता व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे. सदर उपक्रम विभाग वार तीन महाविद्यालयांना (बारा महाविद्यालयांमागे तीन महाविद्यालयांना १२:०३) एका शेक्षणिक वर्षाला दिला जाईल तसेच दुस-या वर्षी मागील वर्षी दिलेल्या महाविद्यालयांना हा उपक्रम मिळणार नाही. दुस-या वषी नविन महाविद्यालयांना हा उपक्रम मिळू शकेल. त्यासाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक असेल.

अभियानाची पात्रता :- ही योजना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय व मान्यताप्राप्त संस्था व विद्यापीठ शेक्षणिक प्रशाळा विभाग यामध्ये पदविका, पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणा-या नियमित विद्यार्थीनींकरीता राबविण्यात येते.

अभियानासाठीचे अनुदान :- या योजनेसाठी विद्यापीठाकडून १५ हजार रुपये अनुदान देण्यात येते