कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे आदिवासी, शेतकरी, कष्टकरी समाज व्यवस्थेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते.
सातपुड्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बंधू-भागीनिपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचे कार्य विद्यापीठ अनेक वर्षांपासून करीत आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ
परिक्षेत्रातील महाविद्यालय व प्रशालांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परन्तु आपल्या कुटुंबात प्रथम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी विद्यापीठाने सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिनी पुरस्कार सुरु केला आहे.
उद्दिष्ट्य: सदर पुरस्काराच्या माध्यमातून कुटुंबातून प्रथम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा उत्साह वाढविणे व तिला आर्थिक मदत करणे.
पुरस्कारासाठी एकूण तरतूद: रु. १ लक्ष
ईशान्य भारत म्हंटला कि तेथील संस्कृती, भौगोलिक आणि सामाजिक रचना अर्थात एकूणच व्यवस्था बाबत मराठी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम दिसून येतो.
हा भाग किवा इथे रहाणारे लोक हे भारतीय बांधव आहेत याचा जणू विसर अनेकदा युवकांना पडून ते त्यांना शंकेच्या नजरेने पाहू लागतात. अशा शंकेखोर नजरांना महराष्ट्रात शिक्षण आणि नोकरीसाठी आलेली ईशान्य भारतीय तरुण मंडळी वैतागते.
यामुळे दोन भारतीय तरुणांमध्येच बंधुभाव जागृत न होता शंका कुशंका निर्माण होतात. ईशान्य भारतीय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थी यांच्यात एक भातृभाव तयार करण्याच्या दृष्टीने सदर योजना सुरु करण्यात येत आहे.
संकल्पना: श्री राजेंद्रजी नन्नवरे, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, क.ब.चौ. उ. म. वी. जळगाव
एकूण तरतूद: रु. १० लक्ष
या खानदेश भूमीने अनेक साहित्यिक व कलावंतांसह शिवाजी लोटन पाटील, नितीन भास्कर यांच्यासारखी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट चित्रपटांसाठी पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक सुद्धा तयार केले आहेत.
युवा चित्रकर्मिंच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा व त्यांना चित्रपट क्षेत्रात नविन दालन निर्माण करून द्यावे यासाठी विद्यापीठातर्फे राष्ट्रीय लघुपट महोत्सव घेण्यात येत आहे.
संकल्पना: श्री राजेंद्रजी नन्नवरे, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, क.ब.चौ. उ. म. वी. जळगाव
एकूण तरतूद: रु. ३ लक्ष